मराठी उखाणे,नवरा नवरी साठी लग्नातील उखाणे
नवरी साठी उखाणे | For Bride
- सुवासिनीच्या गळ्यात काळ्या मण्यांची पोत .....XXX.......ची पत्नी कुलवंत घराची ज्योत
- चांदीच्या करंडाला मोत्याचे झाकण .....XXX....... जिकडे जातील तिकडे कुल दैवतांचे राखण
- राम लक्ष्मण शीता तिन्ही मूर्ती साथ .....XXX.......चे नाव घेते नीट घ्या लक्षात
- देह रुपी नदी आत्मरूपी मासे .....XXX....... चे नाव घेते सूर्य चंद्रे हसे
- केळी नारळी च्या बागेत रघु मैना पक्षी .....XXX....... चे नाव घेते सूर्य चंद्र साक्षी
- कृष्णाची गाय महादेवाचा नंदी .....XXX....... चे नाव घेउन पुढारीला उखाणे देण्यास मिळाली संधी
- इंद्रधनुचे रंग सात ,गाण्याचे सूर साथ .....XXX....... रावांची मिळाली साताजन्माची साथ
- सागराला आली भरती, नदीला आला पूर .....XXX....... च्या साथी साठी माहेर केले दूर
- सौभाग्याचा अलंकार म्हणजे काचेचे तूडे .....XXX....... रावांचे नाव घेते मंगळागौरी पुढे
- शिवाजी सारखा पुत्र, जिजाबाई सारखी माता .....XXX....... रावांचे नाव घेते सर्वांच्या करिता
- पूजेच्या साहित्यात उदबत्त्यांचा पुडा .....XXX....... रावांच्या जीवावर भरला हातभर चुडा
- आईने वाढवल, वडिलांनी शिकवल .....XXX....... रावांनी त्यांची होताच सोन्यान मढवल
- सासर माहेरचे घराणे आहे कुलीन .....XXX....... रावांच्या सहवासात मी राहीन लीन
- अंगणातील तुळस पार्वतीचे स्थान .....XXX....... रावांच्या मुळे मिळाला सौभाग्याचा मान
- नूतन वर्ष्याचा शुभारंभ करीत येतो पाडवा .....XXX....... रावांच्या सानिध्यात सदा राहो गोडवा
- सौभाग्याची जीवनज्योत प्रीत-तेलाने तेवते .....XXX....... रावांना दीर्घ आयुष्य मंगळागौरीस मांगते
- शुभदिनी मंगलकाली मंगलमुर्ती ये घरा .....XXX....... रावांच्या जीवनात भाग्यदेव आला खरा
- दारी असावे अंगण, अंगणात असावी तुळस .....XXX....... राव आहेत माझ्या जीवनाचा कळस
- अधघर मधघर मधघरात होती खुर्ची, खुर्चीवर होती कपबशी कपात होते दुध, दुधात पडली माशी .....XXX....... राव जाताना काशी, मी करते एकादशी
- जीरसाळी चा केला भात वरण झाले दाट .....XXX....... राव बसले जेवायला समया लावा तीनशे साठ
- पायात पैंजण चालू कशी, कमरेत कमरपट्टा वाकू कशी, सासूबाई बसल्यात तुळशीपाशी .....XXX....... रावांचे नाव घेऊ कशी
- आग्र्याच्या उन्हात ताजमहालाची सावली .....XXX....... रावांना जन्म देणारी धन्य ती माउली
- रुणझुण चालत होते, खिडकीवाटे पाहत होते, दरी मोजें कोणाचे सासूबाईच्या पोटचे वन्सच्या पाठचे हरवून बसले मनाला .....XXX....... रावांच्या गुणाला
- इंग्रजी मध्ये पाण्याला म्हणतात वाटर .....XXX....... चे नाव घेते .....XXX....... ची डॉटर
- रामाने राज्य दिले भरताने नाकारले .....XXX....... रावांच्या जीवावर सौभाग्य स्वीकारले
- पाट बाई पाट चंदनाचा पाट .....XXX....... बघतात माडीवर वाट
- चांदीच्या पेल्यात गुलाबी सरबत .....XXX....... रावांशिवाय मला नाही करमत
- मी उभी होते महालक्ष्मी च्या दारी .....XXX....... रोज वाचतात दैनिक पुढारी
- जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने .....XXX....... चे नाव घेते पत्नी नात्याने
- निळ्या घोड्यावर टाकल रेशमी जीन .....XXX....... चे नाव घेते .....XXX....... ची बहिण
- महादेवाच्या पिंडी वर बेल घालते वाकून .....XXX....... चे नाव घेते तुमचा मन राखून
- सोन्याच्या आयण्याला चांदीची बरची .....XXX....... चे नाव घेते आधी सोड खुर्ची
- निळ्या आकाशात पांढरी परी .....XXX....... चे नाव घेते मांडवाच्या दारी
- अरुणोद्याच्या आगमानाची उषेला आतुरता .....XXX....... चे नाव घेते सर्वांकरिता
- वृक्षाला शोभा येते फुलाफुलाने .....XXX....... च्या संसाराल शोभा आली .....XXX....... च्या आगमनाने
- चौष्ठ भाषेचा गौरव केला मराठीने .....XXX....... रावांचे घेते अभिमानाने
- सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडीवले .....XXX....... रावांचे नाव घ्यायला मैत्रिणीनी अडविले
- दह्याचे केले श्रीखंड, दुधाचा केला खवा .....XXX....... रावांचे नाव घेते नीट लक्षात ठेवा
- द्रक्ष्याच्या वेलाला त्रिकोणी पान .....XXX....... रावांचे नाव घेऊन राखते सर्वांचा मान
- श्रीवर्धनी सुपारी अडकीत्याने फोडते .....XXX....... रावांचे नाव घेऊन भाऊ भावजयजीची गाठ सोडते
- पतीव्रतेचा धर्म नम्रतेने वागते .....XXX....... रावांचे घेऊन आशीर्वाद मागते
- महालक्ष्मीच्या मंदिराला सोन्याचा कळस .....XXX....... रावांचे नाव घ्याला मला नाही आळस
- तिरंगी झेंड्या वर अशोक चक्र खून .....XXX....... रावांचे नाव घेते .....XXX....... सून
- हिंद मातेच्या गळ्यात नवरत्नाचा हार .....XXX....... रावांचे नाव घ्यायला आग्रह नको फार
- गुलाबाचा हार गांधींच्या गळ्यात .....XXX....... रावांचे नाव घेते स्त्रियांच्या मेळ्यात
- चैत्र महिन्यात, थंड पाणी भरते गेळ्यात .....XXX....... रावांचे नाव घेते सुहासिनीच्या मेळ्यात
- न चुकता रोजच्या रोज पुढारी वाचते ताजा .....XXX....... रावांच्या नावावर पतिव्रता जन्म माझा
- सोन्याच्या सुपलीत मोत्याचे दाणे .....XXX....... रावांमुळे सुसह्य झाले जीवन गाणे
- चांदीची कळशी साखरेने घासली .....XXX....... रावांचे नाव घेताना राधा कृष्ण हसली
- विठ्ठलाच्या देवळाला सोन्याचा सावज .....XXX....... रावांचे नाव घेते .....XXX....... ची भावज
- पावसाळ्याच्या दिवसात पंचगंगेला आला पूर .....XXX....... ची जीवावर आई भाऊ केले दूर
- अंगणात तुळशी, परसात केळी .....XXX....... रावांचे नाव घेते पूजेच्या वेळी
- महालक्ष्मी च्या मंदिरात उदबत्त्यांचा वास .....XXX....... च्या तोंडी भरवते पेढ्यांचा घास
- द्राक्ष्यांच्या वेलीवर रुमाल टाकते विणून .....XXX....... चे नाव घेते तुमच्या विनंतीवरून
- केळी देते सोलून, पेरू देते चिरून .....XXX....... रावांच्या नावाने कुंकू लावते कोरून
- सासुसारखी सून, घरासारखे गुण .....XXX....... चे नाव घेते .....XXX....... नी सांगितले म्हणून
- सहज आलो दारात नजर गेली आकाशात .....XXX....... चे नाव भारताच्या नकाशात
- चांदीच्या ताटात मोती ठेवले बारा .....XXX....... ना घालते पंखाने वारा
- रोजची सगळी काम करते मन लावुन .....XXX....... चे नाव घेते सारी आसतात भिऊन
- सासू माझी गुणी,सासरे माझे हौशी .....XXX....... नाव घेते पूजेच्या दिवशी
- आषाढ बेंदूर, पहिली पंचमी, पंचमीला पुजते नाग .....XXX....... चे नाव घेते आता सोडा राग
- नेसते पैठणी, कमरेला घालते कमरपट्टा, गळ्यात घालते कोल्हापुरी साज .....XXX....... चे नाव घेते आज
- द्राक्षाच्या वेलीवर तर्हेतर्हेचे पक्षी .....XXX....... राव निवडताना परमेश्वराला ठेवले साक्षी
- पुण्यात पडला पाऊस कोल्हापूरला आला लोंढा .....XXX....... रावांच्या हातात तिरंगी झेंडा
- अंगणात ज्योती, सागरात मोती मी .....XXX....... ची सौभाग्यवती
- कुंकू लावते ठसठसीत, हळद लावते किंचित .....XXX....... रावांचे आणि माझे पूर्वजन्मिचे संचित
- चांदीच्या निरांजनात तुपाची फुलवात .....XXX....... रावांचे नाव घ्यायला आजपासून केली सुरवात
- चांदीचा कंदील त्याला रेशमाची वात .....XXX....... राव निघाले पंढरपूर ला मी नाही राहित घरात
- चांदीच्या ताटात फणसाचे गरे .....XXX....... राव दिसतात बरे पण पिक्चर ला घेऊन जातील तेव्हाच खरे
- सुवासिनीच्या कपाळावर कुंकवाचा टीळा .....XXX....... रावांबरोबर पिकविण मोत्याचा मळा
- हिरवा शालु, हिरवा चोळी ....XXX....... रावांना भरवते पोळी
- फुलाची परडी फुलांनी भरली .....XXX....... रावांनी मला प्रेमाने वरली
- माहेर पासून सासर पर्यंत केली पुष्पवृष्टी .....XXX....... रावांच्या गळ्यात पुष्पहार घालता नटली सारी सृष्टी
- मातीच्या माठात गारगार पाणी .....XXX....... रावांसाठी मी गाईन गोड गोड गाणी
- वडाच्या झाडाचे सुवासिनीच्या कडून पूजन .....XXX....... रावांच्या सोबत करीन वित्ठू रायाचे भजन
- कोल्हपुरी मातीला कुस्तीचा वारसा .....XXX....... राव पाहतात माझ्या डोळ्यात आरासा
- देवाच्या/देवीच्या देवळात तेल तुपाची वाट .....XXX....... रावांना देईन जीवनभर साथ
- माहेर माझ मायेच, सासर माझ प्रेमाच .....XXX....... रावांशी नात जोडलं कायमच
- दसरा गेला, दिवाळी आली .....XXX....... रावांच नाव घेताना लाज आली गाली
- प्रेमाच माझ सासर, मायेच माझ माहेर .....XXX....... रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर
- दूधाच दही, दह्याच ताक , ताकातून काढले लोणी .....XXX....... रावांच नाव घ्यायला सांगायला पाहिजे का कोणी ?
- हिर्याच्या अंगठीला सोन्याचा कडा .....XXX....... रावांच नाव घेते भरून सौभाग्याचा चुडा
- मारुतीने लक्ष्मणासाठी पर्वत आणला ताकतीने .....XXX....... रावांच नाव घेते तुमच्या सर्वांच्या साक्षीने
- झाडे लावा झाडे जगवा मंत्र सांगते ठासून .....XXX....... रावांच नाव घेते सर्वांचा मान राखून
- करवीर नगरीला म्हणतात दक्षिण काशी .....XXX....... रावांच नाव घेते आजच्या दिवशी
- बालशिवाजीला कथा सांगे जिजाई .....XXX....... रावांचे नाव घेते करू नका घाई
- मुलांना द्यावा ज्ञानरूपी वसा .....XXX....... रावांच नाव ऐकायला सावरून बसा
- पहाटेच्या वेळी उमळते कळी .....XXX....... रावांचे नाव घेते हळद कुंकवाच्या वेळी
- दहा दिले पानाला, वीस दिले चुण्याला , तुम्ही विचारलं कुणाला.....XXX....... रावांच्या गुणाला
- चांदीच्या ताटात अत्तराचा बोळा .....XXX....... रावांचे नाव घेताना मैत्रिणी झाल्या गोळा
- अंबाबाईच्या देवळात लाल पिवळी लाईट .....XXX....... रावांचे नाव घेते अच्छा गुड नाईट
- कोल्हापूरच्या मसाल्याला खोबरे घालते खिसून .....XXX....... रावांचे नाव घेते खुर्चीत बसून
- पंचगंगेच्या तीरी कृष्ण वाजवितो बासरी .....XXX....... रावांचे नाव घेते सुखी आहे सासरी
नवऱ्यासाठी उखाणे | For Groom
- विठ्ठलाच्या मंदिरात चांदीची आरती .....XXX....... चे नाव घेतो झाली स्वप्नपूर्ती
- ज्ञानोबाची "ज्ञानेश्वरी" तुकोबाची गाथा .....XXX....... चे नाव घेतो वाट सोडा आता
- भगवा झेंडा किल्ल्यात .....XXX....... चे नाव माझ्या हृदयात
- अंबारीच्या हत्तीला रेशमी झूल .....XXX....... चे हाती गुलाबाचे फुल
- चांदीच्या बिछान्यावर मखमली उषा .....XXX....... चे हाती आहेत माझ्या नावाच्या रेषा
- आकाशात चांदण्या चमचमताना दिसतात .....XXX....... चे नाव घेतान शंकर पार्वती हसतात
- सोन्याच्या ताटात चांदीची आरती .....XXX....... नाव घेतो नवरात्रीच्या रात्री
- रामराज्यात मारला बाण कृष्ण राज्यात सांडलं दही .....XXX....... च्या गळ्यात माझ मंगळसूत्र सही
- चांदीच्या ग्लासात गुलाबी सरबत .....XXX....... निघाली मुंबईला पण मला नाही करमत
आवडले तर कमेंट करायला विसरु नका | Comment in the comment Box


