Tuesday, May 22, 2018

Marathi Ukhane For Bride and Groom


मराठी उखाणे,नवरा नवरी साठी लग्नातील उखाणे 




   नवरी साठी उखाणे | For Bride 

 

  • सुवासिनीच्या गळ्यात काळ्या मण्यांची पोत .....XXX.......ची पत्नी कुलवंत घराची ज्योत 

  • चांदीच्या करंडाला मोत्याचे झाकण .....XXX....... जिकडे जातील तिकडे कुल दैवतांचे राखण 

  • राम लक्ष्मण शीता तिन्ही मूर्ती साथ .....XXX.......चे नाव घेते नीट घ्या लक्षात 

  • देह रुपी नदी आत्मरूपी मासे .....XXX....... चे नाव घेते सूर्य चंद्रे हसे 

  • केळी नारळी च्या बागेत रघु मैना पक्षी .....XXX....... चे नाव घेते सूर्य चंद्र साक्षी 

  • कृष्णाची गाय महादेवाचा नंदी .....XXX....... चे नाव घेउन पुढारीला उखाणे देण्यास मिळाली संधी 

  • इंद्रधनुचे  रंग सात ,गाण्याचे सूर साथ .....XXX....... रावांची मिळाली साताजन्माची साथ 

  • सागराला आली भरती, नदीला आला पूर .....XXX....... च्या साथी साठी माहेर केले दूर 

  • सौभाग्याचा अलंकार म्हणजे काचेचे तूडे .....XXX....... रावांचे नाव घेते मंगळागौरी पुढे 

  • शिवाजी सारखा पुत्र, जिजाबाई सारखी माता .....XXX....... रावांचे नाव घेते सर्वांच्या करिता 

  • पूजेच्या साहित्यात उदबत्त्यांचा पुडा .....XXX....... रावांच्या जीवावर भरला हातभर चुडा 

  • आईने वाढवल, वडिलांनी शिकवल .....XXX....... रावांनी त्यांची होताच सोन्यान मढवल 

  • सासर माहेरचे घराणे आहे कुलीन .....XXX....... रावांच्या सहवासात मी राहीन लीन 

  • अंगणातील तुळस पार्वतीचे स्थान .....XXX....... रावांच्या मुळे मिळाला सौभाग्याचा मान 

  • नूतन वर्ष्याचा शुभारंभ करीत येतो पाडवा .....XXX....... रावांच्या सानिध्यात सदा राहो गोडवा 

  • सौभाग्याची जीवनज्योत प्रीत-तेलाने तेवते .....XXX....... रावांना दीर्घ आयुष्य मंगळागौरीस मांगते

  • शुभदिनी मंगलकाली मंगलमुर्ती ये घरा  .....XXX.......  रावांच्या  जीवनात भाग्यदेव आला खरा  

  • दारी असावे अंगण, अंगणात असावी तुळस .....XXX.......  राव आहेत माझ्या जीवनाचा कळस 

  • अधघर मधघर मधघरात होती खुर्ची, खुर्चीवर होती कपबशी कपात होते दुध, दुधात पडली माशी .....XXX....... राव जाताना काशी, मी करते एकादशी  

  • जीरसाळी चा केला भात वरण झाले दाट .....XXX.......  राव बसले जेवायला समया लावा तीनशे साठ 

  • पायात पैंजण चालू कशी, कमरेत कमरपट्टा वाकू कशी, सासूबाई बसल्यात तुळशीपाशी .....XXX.......  रावांचे नाव घेऊ कशी 

  • आग्र्याच्या उन्हात ताजमहालाची सावली .....XXX.......  रावांना जन्म देणारी धन्य ती माउली

  • रुणझुण चालत होते, खिडकीवाटे पाहत होते, दरी मोजें कोणाचे सासूबाईच्या पोटचे वन्सच्या पाठचे हरवून बसले मनाला .....XXX....... रावांच्या गुणाला 

  • इंग्रजी मध्ये पाण्याला म्हणतात वाटर .....XXX.......  चे नाव घेते .....XXX.......  ची डॉटर 

  • रामाने राज्य दिले भरताने नाकारले .....XXX.......  रावांच्या जीवावर सौभाग्य स्वीकारले 

  • पाट बाई पाट चंदनाचा पाट .....XXX.......  बघतात माडीवर वाट 

  • चांदीच्या पेल्यात गुलाबी सरबत .....XXX.......  रावांशिवाय मला नाही करमत 

  • मी उभी होते महालक्ष्मी च्या दारी .....XXX.......  रोज वाचतात दैनिक पुढारी 

  • जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने .....XXX.......  चे नाव घेते पत्नी नात्याने 

  • निळ्या घोड्यावर टाकल रेशमी जीन .....XXX.......  चे नाव घेते .....XXX.......   ची बहिण 

  • महादेवाच्या पिंडी वर बेल घालते वाकून .....XXX.......   चे नाव घेते तुमचा मन राखून 

  • सोन्याच्या आयण्याला चांदीची बरची .....XXX.......  चे नाव घेते आधी सोड खुर्ची 

  • निळ्या आकाशात पांढरी परी .....XXX.......  चे नाव घेते मांडवाच्या दारी 

  • अरुणोद्याच्या आगमानाची उषेला आतुरता .....XXX.......  चे नाव घेते सर्वांकरिता 

  • वृक्षाला शोभा येते फुलाफुलाने .....XXX.......  च्या संसाराल शोभा आली .....XXX.......  च्या आगमनाने 

  • चौष्ठ भाषेचा गौरव केला मराठीने .....XXX.......  रावांचे घेते अभिमानाने 

  • सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडीवले .....XXX.......  रावांचे नाव घ्यायला मैत्रिणीनी अडविले 

  • दह्याचे केले श्रीखंड, दुधाचा केला खवा .....XXX.......  रावांचे नाव घेते नीट लक्षात ठेवा 

  • द्रक्ष्याच्या वेलाला त्रिकोणी पान .....XXX.......   रावांचे नाव घेऊन राखते सर्वांचा मान 

  • श्रीवर्धनी सुपारी अडकीत्याने फोडते .....XXX.......  रावांचे नाव घेऊन भाऊ भावजयजीची गाठ सोडते 

  • पतीव्रतेचा धर्म नम्रतेने वागते .....XXX.......  रावांचे घेऊन आशीर्वाद मागते

  • महालक्ष्मीच्या मंदिराला सोन्याचा कळस .....XXX.......  रावांचे नाव घ्याला मला नाही आळस 

  • तिरंगी झेंड्या वर अशोक चक्र खून .....XXX.......  रावांचे नाव घेते .....XXX.......  सून 

  • हिंद मातेच्या गळ्यात नवरत्नाचा हार .....XXX.......  रावांचे नाव घ्यायला आग्रह नको फार 

  • गुलाबाचा हार गांधींच्या गळ्यात .....XXX.......  रावांचे नाव घेते स्त्रियांच्या मेळ्यात 

  • चैत्र महिन्यात, थंड पाणी भरते गेळ्यात .....XXX.......  रावांचे नाव घेते सुहासिनीच्या मेळ्यात

  • न चुकता रोजच्या रोज पुढारी वाचते ताजा .....XXX....... रावांच्या नावावर पतिव्रता जन्म माझा 

  • सोन्याच्या सुपलीत मोत्याचे दाणे .....XXX....... रावांमुळे सुसह्य झाले जीवन गाणे 

  • चांदीची कळशी साखरेने घासली .....XXX....... रावांचे नाव घेताना राधा कृष्ण हसली 

  • विठ्ठलाच्या देवळाला सोन्याचा सावज .....XXX....... रावांचे नाव घेते .....XXX....... ची भावज 

  • पावसाळ्याच्या दिवसात पंचगंगेला आला पूर .....XXX....... ची जीवावर आई भाऊ केले दूर 

  • अंगणात तुळशी, परसात केळी .....XXX....... रावांचे नाव घेते पूजेच्या वेळी 

  • महालक्ष्मी च्या मंदिरात उदबत्त्यांचा वास   .....XXX....... च्या तोंडी भरवते पेढ्यांचा घास 

  • द्राक्ष्यांच्या वेलीवर रुमाल टाकते विणून .....XXX....... चे नाव घेते तुमच्या विनंतीवरून 

  • केळी देते सोलून, पेरू देते चिरून .....XXX....... रावांच्या नावाने कुंकू लावते कोरून 

  • सासुसारखी सून, घरासारखे गुण .....XXX....... चे नाव घेते .....XXX....... नी सांगितले म्हणून 

  • सहज आलो दारात नजर गेली आकाशात .....XXX....... चे नाव भारताच्या नकाशात 

  • चांदीच्या ताटात मोती ठेवले बारा .....XXX....... ना घालते पंखाने वारा 

  • रोजची सगळी काम करते मन लावुन .....XXX....... चे नाव घेते सारी आसतात भिऊन 

  • सासू माझी गुणी,सासरे माझे हौशी .....XXX....... नाव घेते पूजेच्या दिवशी 

  • आषाढ बेंदूर, पहिली पंचमी, पंचमीला पुजते नाग .....XXX....... चे नाव घेते आता सोडा राग 

  • नेसते पैठणी, कमरेला घालते कमरपट्टा, गळ्यात घालते कोल्हापुरी साज .....XXX....... चे नाव घेते आज 

  • द्राक्षाच्या वेलीवर तर्हेतर्हेचे पक्षी .....XXX....... राव निवडताना परमेश्वराला ठेवले साक्षी 

  • पुण्यात पडला पाऊस कोल्हापूरला आला लोंढा .....XXX....... रावांच्या हातात तिरंगी झेंडा 

  • अंगणात ज्योती, सागरात मोती मी .....XXX....... ची सौभाग्यवती 

  • कुंकू लावते ठसठसीत, हळद लावते किंचित .....XXX....... रावांचे आणि माझे पूर्वजन्मिचे संचित 

  • चांदीच्या निरांजनात तुपाची फुलवात .....XXX....... रावांचे नाव घ्यायला आजपासून केली सुरवात 

  • चांदीचा कंदील त्याला रेशमाची वात .....XXX....... राव निघाले पंढरपूर ला मी नाही राहित घरात 

  • चांदीच्या ताटात फणसाचे गरे .....XXX....... राव दिसतात बरे पण पिक्चर ला घेऊन जातील तेव्हाच खरे 

  • सुवासिनीच्या कपाळावर कुंकवाचा टीळा .....XXX....... रावांबरोबर पिकविण मोत्याचा मळा 

  • हिरवा शालु, हिरवा चोळी ....XXX....... रावांना भरवते पोळी 

  • फुलाची परडी फुलांनी भरली .....XXX....... रावांनी मला प्रेमाने वरली

  • माहेर पासून सासर पर्यंत केली पुष्पवृष्टी .....XXX....... रावांच्या गळ्यात पुष्पहार घालता नटली सारी सृष्टी 

  • मातीच्या माठात गारगार पाणी .....XXX....... रावांसाठी मी गाईन गोड गोड गाणी 

  • वडाच्या झाडाचे सुवासिनीच्या कडून पूजन .....XXX.......  रावांच्या सोबत करीन वित्ठू रायाचे भजन 

  • कोल्हपुरी मातीला कुस्तीचा वारसा .....XXX.......  राव पाहतात माझ्या डोळ्यात आरासा 

  • देवाच्या/देवीच्या देवळात तेल तुपाची वाट .....XXX.......  रावांना देईन जीवनभर साथ 

  • माहेर माझ मायेच, सासर माझ प्रेमाच .....XXX.......  रावांशी नात जोडलं कायमच 

  • दसरा गेला, दिवाळी आली .....XXX....... रावांच नाव घेताना लाज आली गाली 

  • प्रेमाच माझ सासर, मायेच माझ माहेर .....XXX.......  रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर 

  • दूधाच दही, दह्याच ताक , ताकातून काढले लोणी .....XXX....... रावांच नाव घ्यायला सांगायला पाहिजे का कोणी ?

  • हिर्याच्या अंगठीला सोन्याचा कडा  .....XXX....... रावांच  नाव घेते भरून सौभाग्याचा चुडा 

  • मारुतीने लक्ष्मणासाठी पर्वत आणला ताकतीने .....XXX.......  रावांच नाव घेते तुमच्या सर्वांच्या साक्षीने 

  • झाडे लावा झाडे जगवा मंत्र सांगते ठासून .....XXX....... रावांच  नाव घेते सर्वांचा मान राखून 

  • करवीर नगरीला म्हणतात दक्षिण काशी .....XXX....... रावांच नाव घेते आजच्या दिवशी 

  • बालशिवाजीला  कथा सांगे जिजाई .....XXX....... रावांचे नाव घेते करू नका घाई

  • मुलांना द्यावा ज्ञानरूपी वसा .....XXX....... रावांच नाव ऐकायला  सावरून बसा 

  • पहाटेच्या वेळी उमळते कळी .....XXX....... रावांचे नाव घेते हळद कुंकवाच्या वेळी 

  • दहा दिले पानाला, वीस दिले चुण्याला , तुम्ही विचारलं कुणाला.....XXX.......  रावांच्या गुणाला 

  • चांदीच्या ताटात अत्तराचा बोळा .....XXX....... रावांचे नाव घेताना मैत्रिणी झाल्या गोळा 

  • अंबाबाईच्या देवळात लाल पिवळी लाईट .....XXX....... रावांचे नाव घेते अच्छा गुड नाईट 

  • कोल्हापूरच्या मसाल्याला खोबरे घालते खिसून .....XXX....... रावांचे नाव घेते खुर्चीत बसून 

  • पंचगंगेच्या तीरी कृष्ण वाजवितो बासरी .....XXX....... रावांचे नाव घेते सुखी आहे सासरी 

   नवऱ्यासाठी उखाणे | For Groom 



  • विठ्ठलाच्या मंदिरात चांदीची आरती .....XXX....... चे नाव घेतो झाली स्वप्नपूर्ती 

  • ज्ञानोबाची "ज्ञानेश्वरी" तुकोबाची गाथा .....XXX....... चे नाव घेतो वाट सोडा आता

  • भगवा झेंडा किल्ल्यात .....XXX....... चे नाव माझ्या हृदयात 

  • अंबारीच्या हत्तीला रेशमी झूल .....XXX....... चे हाती गुलाबाचे फुल 

  • चांदीच्या बिछान्यावर मखमली उषा .....XXX.......  चे हाती आहेत माझ्या नावाच्या रेषा 

  • आकाशात चांदण्या चमचमताना दिसतात .....XXX.......  चे नाव घेतान शंकर पार्वती हसतात 

  • सोन्याच्या ताटात चांदीची आरती .....XXX....... नाव घेतो नवरात्रीच्या रात्री 

  • रामराज्यात मारला बाण कृष्ण राज्यात सांडलं दही .....XXX....... च्या गळ्यात माझ मंगळसूत्र सही 

  • चांदीच्या ग्लासात गुलाबी सरबत .....XXX....... निघाली मुंबईला पण मला नाही करमत 



आवडले तर कमेंट करायला विसरु नका | Comment in the comment Box


2 comments: